गोवा येथे होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्ती संघ जाहीर

पुणे : गोवा पणजी येथे 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर येथे होणाऱ्या 37 व्या नॅशनल गेम्स कुस्ती स्पर्धा 2023साठी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे येथे आज शनिवार दि.7 आणि 8 ऑक्टोबर 2023 रोजी फ्रिस्टाईल, ग्रिको रोमन आणि महिला कुस्ती स्पर्धेत 183 कुस्तीगीर आणि 63 महिला कुस्तीगीरांनी सहभाग घेतला. गोवा येथे होणाऱ्या 37व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्ती संघ जाहीर करण्यात आला.

या निवड चाचणी स्पर्धेसाठी परिषदेचे सचिव प्रा.बाळासाहेब लांडगे,अर्जुनवीर,आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलचे अध्यक्ष पै.काकासाहेब पवार, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारी सदस्य सोपानराव कटके, निलेश जगताप,विजय बराटे,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रुस्तुम ए हिंद पै.अमोल बुचडे,हिंद केसरी पै.अमोल बराटे,तांत्रिक सचिव प्रा.बंकट यादव,कार्यकारी सदस्य पै.अमृता मामा भोसले, पै.सुभाष ढोणे,कार्यालयीन सचिव श्री.ललित लांडगे,आंतरराष्ट्रीय पंच पै.नवनाथ धमाळ,पै.रोहिदास आमले,सोशल मिडिया प्रमुख डॉ.प्रा.विनोद हनुमान पाटील, शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित श्री.सुनिल बापू लिमण,प्रा.किसनराव बुचडे यांच्या उपस्थितीत तांत्रिक सचिव डॉ.बंकट यादव आणि आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ धमाळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पंच पै.बाळासाहेब मेटकर,प्रकाश खोत,सचिन आवळे,सचिन खांदवे,रवि बोत्रे,गणेश जाधव,महालिंग खांडेकर,सतीश कदम,यशवंत कुंभार,सतीश म्हात्रे,जयनाथ पाटील,गणेश पाटील,प्रा.सागर तांगडे,रविंद्र पाटील,सतिष पाटील,विलास पाटील,अक्षय डेलेकर,प्रकाश घोरपडे,निलेश पाटील,राजेंद्र कणसे,प्रज्वलदीप ढोणे,चंद्रकांत मोहोळ प्रा.श्रीराम पाटील,बाबा लिमण यांनी निःपक्षपाती कामगिरी केली.आणि सहभागी कुस्तीगीर,वस्ताद,मार्गदर्शक,प्रेक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.


राष्ट्रीय फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला संघ पुढीलप्रमाणे –
पै. वैभव पाटील-कोल्हापूर 57 किलो
पै.विनायक गुरव – कोल्हापूर74 किलो
पै.कौस्तुभ डाफळे कोल्हापूर 86 किलो
पै पृथ्वीराज पाटील -कोल्हापूर 97 किलो
आणि
राष्ट्रीय ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला संघ पुढील प्रमाणे-
पै.विक्रम कुऱ्हाडे- कोल्हापूर 60 किलो
पै.विनायक पाटील- कोल्हापूर 67 किलो
पै.समीर पाटील कोल्हापूर-77 किलो
पै.शैलेश शेळके लातूर -97 किलो
पै.तुषार डूबे पुणे- 130 किलो
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला महिला कुस्ती संघ पुढीलप्रमाणे-
पै.नंदिनी साळुंखे-कोल्हापूर 50 किलो
पै.धनश्री फड-अहमदनगर 53 किलो
पै.सोनाली मंडलिक -अहमदनगर 57 किलो
पै.भाग्यश्री फड-अहमदनगर 62 किलो
पै.प्रतिक्षा बागडे- सांगली 68 किलो.
पै.अमृता पुजारी-कोल्हापूर 76 किलो
यांची गोवा पणजी येथे होणाऱ्या नॅशनल गेम्ससाठी निवड झाली.

See also  रशियातील 'रशियन फ्रेंडशिप कप रेस' मध्ये सार्थक चव्हाण याने टीम इंडियाला पहिल्यांदाच 5 व्या क्रमांकावर स्थान मिळवून दिले