अखेर.. 37 व्या नॅशनल गेम करिता महाराष्ट्रचा कुस्ती संघ निवडला; पण राज्यातील दोन संघटनांबाबत भूमिका स्पष्ट नाही

पुणे : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने केलेल्या सुचना प्रमाणे बालेवाडी , पुणे येथे कुस्तीगीर परीषद व कुस्तीगीर संघ यांनी घेतलेल्या निवड चाचणीत प्रथम क्रमांक आलेल्या कुस्तीगीरांची पुन्हा आपापसात कुस्त्या घेऊन निवड चाचणी घेण्यात आली व महाराष्ट्राचा खालील संघ ३७ व्या नॅशनल गेम करीता एकमताने निवडण्यात आला.

भारतीय कुस्ती महासंघ WFI च्या अस्थाई कमिटीचे सदस्य श्री भूपेंदर सिंग बाजवा यांनी पाठविलेल्या दि.23 ऑक्टोंबर 2023 च्या पत्रा मध्ये उल्लेख केलेल्या माहिती नुसार दि.25 ऑक्टोंबर 2023 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांनी निवडलेल्या दोन्ही अंतिम संघामधील खेळाडूं मध्ये पुणे बालेवाडी येथील क्रीडा नगरीमध्ये पुन्हा निवड चाचणी घेऊन महाराष्ट्राचा एकच नवीन संघ गोवा येथे होणा-या नॅशनल गेमसाठी पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाच्या अधिकाऱ्यांच्या समोर राष्ट्रीय स्पर्धांसाठी हा संघ निवडण्यात आला.

महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी होत असून महाराष्ट्र राज्यात कुस्तीच्या दोन राज्य संघटना आस्तित्वात आल्याचे दिसते. यापुढे राज्यातील सर्व शहर जिल्हा संघात ही दोन दोन संघ निवडले जाणार का असा प्रश्न कुस्ती खेळाडू व कोण यांच्या कडून उपस्थित केला जात आहे.या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रात दुफळी झाल्याचे दिसते तसेच 70 वर्षांची कुस्तीची परंपरा असलेली आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला नवीन प्रतिस्पर्धी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ उदयास आला असल्याचे दिसून येते. भारतीय कुस्ती महासंघाची दोन्ही संघांना दिलेली संधी हे राज्यात कुस्ती क्षेत्रात अस्थिरता निर्माण करणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

३७ व्या गोवा नॅशनल गेम करीता महाराष्ट्राचा संघ जाहीर पुढीलप्रमाणे
फ्रीस्टाईल संघ
५७ कीलो – पै.अमोल बोंगार्डे
७४ कीलो – पै. विनायक गुरव –
८६ कीलो – पै. कौतुक डाफळे
९७ कीलो – पै. सतपाल सोनटक्के
ग्रिकोरोमन संघ
६० कीलो – पै.विक्रम कुऱ्हाडे
६७ कीलो – पै.विनायक पाटील
७७ कीलो – पै.समीर पाटील
९७ कीलो – पै.रोहीत अहीरे
१३० कीलो – पै.तुषार डुबे
महीला संघ
५० कीलो – पै. नंदीनी साळुंखे
५३ कीलो – पै. धनश्री फंड
५७ कीलो – पै. सोनाली मंडलिक
६२ कीलो – पै. भाग्यश्री फंड
६८ कीलो – पै. प्रतिक्षा बागडी
७६ कीलो – पै.अमृता पुजारी
या निवड चाचणी करीता महाराष्ट्र शासन यांचे प्रतिनीधी उपस्थित होते. तसेच कुस्तीगीर परिषद यांचे प्रतिनिधी उपस्थित होते . तसेच कुस्ती पंच म्हणुन पै.मारुती सातव , पै.नवनाथ ढमाळ , पै.विकास पाटील , पै.रोहीदास आम्ले , पै.हेमलता घोडके हे उपस्थित होते.

See also  गुणवान खेळाडूंना सरावासाठी सर्व सहकार्य-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील