महाशिवरात्रीनिमित्त बाणेरला विविध कार्यक्रमांचे आयोजन

औंध :  बाणेर येथील श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थानच्या वतीने पांडव कालीन गुफा मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी (ता.७) सायंकाळी पाच वाजता १००८ शंखनिनाद व साडे सहा ते आठ वाजता होम हवन करण्यात येणार आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवार (ता.८) रोजी रात्री बारा ते पहाटे चार वाजता शिवाभिषेक सकाळी साडेसात वाजता महारुद्राभिषेक(आर्ट ऑफ लिव्हिंग) होणार आहे.

तर दुपारी बारा ते तीन या वेळेत बाणेर महिला मंडळाचे भजन होणार आहे.साडेपाच ते सात या वेळेत श्रीमती चरण्या गुरूसत्या नाट्यशाळा अकॅडमीचे भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे.रात्री आठ वाजता महाआरती,दहा ते बारा गुरु माऊली भजनी मंडळ यांचे भजन व रात्री बारा ते सव्वा एक पर्यंत महाशिवरात्री निशिथकाल पूजा होईल.तसेच संपूर्ण दिवस दर्शन व महाप्रसाद होणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट व समस्त बाणेरकरांच्या वतीने करण्यात आले आहे

See also  माय माऊली केअर सेंटर ला बिबेवाडी महिला मंडळाचे सदिच्छा भेट