बाणेर येथे सप्तश्रृंग आयुर्वेदीय चिकित्सालयात मोफत आरोग्य शिबिर संपन्न

पुणे : सप्तश्रृंग आयुर्वेदीय चिकित्सालय, बाणेर, यांच्या वतीने  एक दिवसीय मोफत आयुर्वेदीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात १५ रुग्णांना औषधोपचार करण्यात आले.शिबिरामध्ये रुग्णांना प्रारंभिक तपासणी, औषधोपचार, पंचकर्म सल्ला, दिनचर्या व ऋतुचर्या मार्गदर्शन, तसेच सुर्णप्राशन माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले.


यावेळी वैद्य .लक्ष्मण लावगनकर, वैद्य.गार्गी लावगनकर, श्री.नितीन मेटकर,सौ.राजश्री मेटकर ,वैद्य.सुप्रिया गोरे,वैद्य.आश्विनी मकरिये,वैद्य.भाग्यश्री जाधव,वैद्य.देवाशीष उंब्रजकर,वैद्य.पद्मश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.

See also  कात्रज-कोंढवा रस्ते प्रकल्पासाठी भूसंपादनाला वेग; १९७ कोटींच्या निधीतून २५ हजार चौ.मी. जागा मनपाच्या ताब्यात