सुसरोड वरून हायवेवर जाणाऱ्या नागरिकांसाठी रस्ता व पादचारी पूल उभारण्याची राहुल कोकाटे यांची मागणी

पुणे : सुस-रोड वरुन हायवे सर्विस रोडला जाण्यासाठी सर्विस रस्ता व पादचारी नागरिकांसाठी महामार्गावर पूल उभारण्यात यावा अशी मागणीचे निवेद भाजपाचे राहुल कोकाटे यांनी मनपा प्रकल्प विभाग प्रमुख दिनकर गोजारी यांना दिले.

पुणे मनपा प्रकल्प विभागाच्या माध्यमातून पाषाण सुस-रोड वरुन चांदणी चौक, बावधन कडे जाण्यासाठी ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे,NH4 लगत रिटेनिंग वाॅल बांधुन हा प्रोजेक्ट उभारला जाईल. त्यामुळे नागरिकांना सुस-रोड वरुन बावधन, चांदणी चौकाकडे जाण्यास रस्ता विकसित होऊन सुस-रोड वरील वाहतुक सुरळीत होईल, अशी माहीती पुणे शहर भाजप उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी दिली.

तसेच सदर प्रोजेक्ट मध्येच सुस-रोड वरील पादचाऱ्यांना हायवे ओलांडण्यासाठी सुस-रोड वरील पुलाला समांतर पादचारी मार्ग बांधावा व पुलाला संरक्षक ग्रील उभारण्यात अशी मागणी राहुल कोकाटे यांनी केली,यावेळी पुणे मनपा प्रकल्प विभाग प्रमुख दिनकर गोजारी उपस्थित होते.

See also  वसुंधरा अभियान कडून कडुलिंबाचे झाड लावून गुढीपाडवा नववर्षाचे स्वागत