कस्पटे चौक येथील वाकड ते बालेवाडी ला जोडणाऱ्या बालेवाडीच्या बाजूने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची आमदार शंकर जगताप यांच्याकडून पाहणी

वाकड : पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांच्या पाठपुराव्यातून कस्पटे चौक येथील वाकड ते बालेवाडी ला जोडणाऱ्या बालेवाडीच्या बाजूने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी आमदार शंकर जगताप यांनी केली. यावेळी या रस्त्याच्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला.

या रस्त्यामध्ये टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज लाइन, पाईप लाइन आणि झाडांच्या प्रत्यारोपण बाबत सविस्तर आढावा घेतला. या रस्त्याचे काम जानेवारी अखेरीस पूर्ण करून देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  मुळशी साठी पुर्ण वेळ गटविकास अधिकारी मिळावा म्हणून स्वराज्य पक्षाचे बोंबा मारो आंदोलन