पाषाण ब्रिजखाली कचरा गाड्यांमुळे सर्विस रस्त्यावर वाहतूक समस्येत वाढ

पाषाण : पुणे महानगरपालिकेच्या कचरा संकलनाच्या गाड्या राष्ट्रीय महामार्गाच्या सर्विस रस्त्यालगत उभ्या करून कचरा संकलन केले जात असल्याने या परिसरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. पाषाण ब्रिजखालील सर्विस रस्त्यावर कचरा संकलनाच्या गाड्या थांबवल्या जात असल्याने वाहनचालक तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

महामार्गालगत कचरा संकलन होत असल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर तसेच ये-जा करणाऱ्या नागरिकांवर होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर सर्विस रस्त्यावर कचरा संकलनाची वाहने उभी राहत असल्याने रस्त्याची वाहतूक क्षमता कमी होते आणि महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांनाही त्याचा फटका बसतो.

विशेषतः पाषाण ब्रिजखाली पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनाच्या गाड्या सर्विस रस्त्यावर उभ्या करून कचरा संकलन केले जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा संकलनाच्या गाड्या थांबवू नयेत आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधित वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, महामार्गालगत असलेल्या अनधिकृत हॉटेल्स अथवा इतर व्यावसायिक आस्थापनांचा कचरा संकलित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सर्विस रस्ता अडवणे योग्य नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. कचरा संकलनासाठी पर्यायी आणि नियोजित जागेची व्यवस्था करावी, तसेच महामार्ग व सर्विस रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही याची महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.

महापालिका प्रशासनाने या प्रकाराची पाहणी करून कचरा संकलनाची व्यवस्था आणि वाहनांच्या पार्किंगबाबत स्पष्ट नियमावली लागू करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

See also  "कार्यकर्त्यांनी त्यांच्यातला "कार्य" "कर्ता" जिवंत आणि जागता ठेवावा - संदीप खर्डेकर"."ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने दुर्गम भागातील शाळेत जर्किन भेट"