जिल्हाधिकारी कार्यालयात अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

पुणे : पुराभिलेख संचलनालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पुराभिलेख कार्यालय मुंबई, नागपूर व कोल्हापूर येथील अभिलेख अधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखा मधील अभिलेखपाल आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख २००५ बाबतची माहिती, पुराभिलेख विभागाचे कामकाज, अभिलेखाचे महत्त्व, अभिलेखाचे जतन, आदर्श मांडणी व संवर्धन याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

श्रीमती कदम यांनीदेखील कार्यशाळेस मार्गदर्शन केले. शासकीय कार्यालयातील अभिलेखाचे जतन नीटपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावे. तसेच अभिलेख वेळेवर उपलब्ध होतील, सुरक्षित राहतील याप्रकारे त्यांची मांडणी करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

See also  जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार व देशातील कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सन्मान: औंधच्या अमोल टेंबरे यांना भारत भूषण पुरस्कार