दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या ईडीच्या पथकाने दोन तास केजरीवाल यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे.

केजरीवाल यांना उत्पादन शुल्क प्रकरणात चौकशीसाठी ईडीने वारंवार समन्स पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांना ईडीने यापूर्वी 9 वेळा समन्स बजावले आहे. मात्र ते चौकशीसाठी हजर होत नव्हते. दरम्यान, ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु उच्च न्यायालयाने अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर  लगेच ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घराचा काहीवेळ तपास केला. केजरीवाल यांचे दुरध्वनी जप्त करून त्यांची दोन तासांपेक्षाही अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यावेळी उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथील केजरीवाल यांच्या निवासस्थानाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला होता.अखेर ईडीने दोन तास चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक केली आहे. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

See also  महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष यात्रा महत्त्वाची ठरली -शरद पवार