कोथरूड मध्ये सजग कार्यकर्ते व शिवसेनेच्या ॲम्बुलन्स मुळे वाचले तरुणाचे प्राण

कोथरूड : कोथरूड शिवसेना शाखा कर्वे रोड,शितल हॉटेल समोर दुचाकी वरील तरुण गंभीर अपघातात जखमी झाला. यावेळी विनाविलबं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रुग्णवाहिका तिथे उपलब्ध  करण्यात आली यामुळे योग्य वेळेत उपचार मिळाल्याने तरुणाचा जीव वाचवण्यास मदत मिळाली. 

महर्षी कर्वे पुतळ्याजवळ दुचाकीवरून चाललेल्या तरुण दुभाजकाला धडकल्याने डोक्याला जखम झाल्याने गंभीर जखमी झाला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव वाहत असल्याने या तरुणाला तत्काळ तात्काळ जवळील कै. सरस्वती कराड एमआयटी पौड रोड येथे ऍडमिट करण्यात आले. तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे त्या तरुणाचे प्राण वाचले. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य जयदीप पडवळ,संदिपदादा मोकाटे,  विशालभाऊ भेलके, मारुती वर्वे, अजयभाऊ भुवड,  संतोष लांडे, यश जगताप अधिक कार्यकर्ते तसेच नागरिक व इतरांनी लगेच त्या मुलाला हाॅस्पिटलला घेऊन जायची व्यवस्था केली. जयदीप पडवळ यांनी रुग्णवाहिका चालकाची वाट न पाहता स्वतः रुग्णवाहिका  चालवून पेशंट हॉस्पिटल पर्यंत पोहोचवला.सदर एकांत त्यागी हा तरुण कामानिमित्त उत्तर प्रदेशामधून पुण्यात आला होता.

See also  सुतारवाडी पाषाण कै.मारुती महादू सुतार विद्यालय इमारत उदघाटन व नामकरण समारंभ गुरुवारी