कोथरूड विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणीविषयी प्रशिक्षण

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्यावतीने युवा मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर येथे २१ ऑगस्ट रोजी मतदार नोंदणी शिबीर आणि विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नवीन मतदार नोंदणी करण्याबाबत सुमारे १०० विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले. मतदार नोंदणी ही लोकशाहीच्या सुदृढीकरणासाठी पहिली पायरी असून युवक-युवतींनी स्वतःची तसेच घरातील सर्व पात्र सदस्यांची मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी केले.

हिराबेन नानावटी मॅनेजमेंट इन्स्टीट्युटच्या संचालिका डॉ. सूर्या रामदास यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी अंजली कुलकर्णी, केदार वझे आदी उपस्थित होते.

See also  खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य व्यवस्थापन विभाग सज्ज