सुसखिंड येथील पुलावरील उतरण्यासाठी सर्विस रस्ता करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी ; वाहतूक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची घेतली भेट

पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुस रोड वरून सुसखिंडीतील बाणेर बालेवाडी कडे जाणाऱ्या रस्ता दुभाजकाचे काम रेंगाळले होते. पुणे शहर प्रमुख  गजानन थरकुडे ,शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज  सुतार, अजय निम्हण, यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर यांची भेट घेण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय याबाबत चर्चा करण्यात आली. त्या प्रश्नाला पर्याय म्हणून  मनोज पाटील साहेब यांनी सदर पुलावरून खाली उतरण्यासाठी लागणारा सर्विस रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी त्यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे. लवकरात लवकर सदर रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर प्रमुख गजानन भाऊ थरकुडे व संतोष तोंडे (विभाग प्रमुख),संजय निम्हण (विभाग संघटक), अजय  निम्हण ,स्वातीताई रणपिसे (विभाग संघटिका), अशोक दळवी ,महेश सुतार (शिवदूत), रामदास निम्हण (शिवसेना नेते),ऋषिकेश कुलकर्णी (प्रभाग प्रमुख),  निखिल निम्हण (प्रभाग प्रमुख),दिनेश नाथ (उपविभाग प्रमुख),संदीप सातव (उपविभाग प्रमुख) ,अमित रणपिसे (युवा सेना अधिकारी), गणेश दळवी (शिवसैनिक),शिवाजी टवाळ,  करण कांबळे (प्रचार प्रसिद्धी प्रमुख),दशरथ खेडेकर( प्रभाग संघटक), अजिंक्य सुतार (शाखाप्रमुख), अमोल फाले (शाखाप्रमुख) , सुनील राजगुरू (शाखाप्रमुख), सुनिता रानवडे (शाखा संघटिका), सुरज चोरमुले (शाखा संघटक),मोहन कांबळे ,आजी-माजी पदाधिकारी सर्व उपस्थित होते.

See also  युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची गणेशोत्सवा मध्ये श्रीशिवसाम्राज्य प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळास भेट