कसब्यात “हू इज धंगेकर” ची आठवण करून देणारी निवडणूक पुन्हा एकदा रंगणार

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा “हू इज धंगेकर” ची आठवण करून देणारी निवडणूक पुन्हा एकदा रंगणार आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा च्या वतीने हेमंत रासने यांना मैदानात उतरवण्यात आले असून काँग्रेस पक्षाच्या वतीने रवींद्र धंगेकर हे रिंगणात आहेत.

माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे रवींद्र धनगेकर हे भाजपाच्या हेमंत रासने यांना पराभूत करत विजयी झाले होते.

ज्यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचारादरम्यान “हू इज धंगेकर” असा खोचक टोला लावला होता तो प्रचारादरम्यान प्रचंड गाजला. आता पुन्हा रासने व धंगेकर ही लढत कसबा विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात रंगणार आहे.

यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे यादेखील रिंगणात असणार असून त्यांच्या भूमिकेकडे देखील राजकीय वर्तुळातील चर्चांचे लक्ष वेधले आहे.

See also  कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळून कॅरेज वेमध्ये पार्किंगला परवानगी द्या!पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे वाहतूक पोलीस आणि महापालिकेला निर्देश