पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य पदाकरिता पदाकरिता आरक्षण जाहीर

पुणे, दि. १३ : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील ७३ सदस्य पदाकरिता आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात  येथे आयोजित सोडतीच्यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा गाऊडदराचे शिक्षक व विद्यार्थी तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.

See also  आम आदमी पार्टीकडून नगररोड क्षेत्रीय कार्यालया बाहेर "भीक मांगो" आंदोलन