पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सर्वात आधी अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत होती. पण आता अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय झालं याबद्दल देखील मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्यासोबत 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
























