औंध येथे जागतिक MSME दिना निमित्त ‘उद्योग – व्यवसाय कर्ज कार्यशाळेचे’ आयोजन

पुणे : औंध येथे सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी ‘जागतिक MSME दिनाच्या औचित्याने एका विशेष कर्ज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या सुप्रसिद्ध सोमेश्वर फाउंडेशन, मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन, आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या २५ जून रोजी औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृहात हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून यात उपस्थितांना तज्ज्ञांचे मागर्दशन लाभणार आहे. माजी नगरसेवक आणि युवा उद्योजक सनी विनायक निम्हण या कार्यशाळेचे निमंत्रक आहेत.

शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट दिवंगत आमदार विनायक निम्हण यांचे सुपुत्र माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने तरुण उद्योजक आणि व्यावसायिकांना मदत करणाऱ्या सुप्रसिद्ध सोमेश्वर फाऊंडेशन तसेच दे आसरा फाऊंडेशन आणि मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी २५ जुन २०२३ रोजी दुपारी ४ वाजता औंध येथील पंडित भीमसेन जोशी सभागृहात ‘उद्योग व्यवसाय कर्ज कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे.

या उपक्रमात सुप्रसिद्ध बँकिंग फायनान्स तज्ञ तथा कर सल्लागार तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच ‘बिझनेस लोन रेडिनेस’ या विषयावर प्रकाश आगाशे, प्रोग्राम मॅनेजर – द आसरा फाऊंडेशन, यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, विद्या सहकारी बँक, तसेच विश्वेश्वर सहकारी बँक यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने या बँकांकडून पाञ उद्योजक व्यवसायिकांना कर्ज मिळणार आहे.

पारंपारिक नोकरीची वाट न धरता अनेक युवकांनी उद्योग-व्यवसाय साकारले आहेत. स्वतःच्या व्यवसायातील यशस्वी टप्प्यानंतर आपल्या उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना आर्थिक पाठबळ द्यावे या उदात्त हेतूने उद्योग व्यवसाय वाढीसाठी चालना देणारा हा उपक्रम आहे. व्यवसाय उभारणीमध्ये महत्वाचा घटक म्हणजे भांडवल. हे भांडवल मिळवून देण्यासाठी मार्केटमध्ये अनेक बँका आणि वित्तीय संस्थामार्फत उद्योग-व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे. परंतु ते मिळवण्यासाठी नेमके करायचं काय? कुठली कागदपत्रे लागतात? त्यात पाञ कसे ठरायचे? फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

See also  कोथरुडमध्ये होणार ग्राहक- विक्रेत्यांचा 'समुत्कर्ष' नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून नव्या ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ

आपल्या व्यवसाय व उद्योगाच्या विस्ताराकरिता कर्ज उभारणीसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. तरुण उद्योजकांनी या कार्यशाळेला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री. सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेस दे आसरा फाऊंडेशनच्या कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली अपराजित,निधी तज्ज्ञ सुधीर गिजरे,मराठा एंत्रप्रेन्योर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण आदी उपस्थित होते.

या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी www.sunnynimhan.com वर भेट देऊन नावनोंदणी करावी.