मुंबई : ‘भारतीय मराठा संघाने’ आझाद मध्ये जाऊन मराठा वनवास यात्रेला दिला पाठिंबा. 17 तारखेला हजारोंच्या संख्येने मराठा मुंबईत दाखल होणार.
मराठा वनवास यात्रा गेल्या महिनाभरापासून आझाद मैदानावर बसललेले आहेत. दोन तीन दिवसांपासून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांवर केलेल्या अत्याचारामुळे समाजात फार मोठी चीड निर्माण झाली आहे. ज्या कोपर्डीच्या घटनेमुळे महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी पडली. त्या भगिनीच्या स्मृती दिनीच आंदोलकांना धरपकड करून डांबून ठेवल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून रोष व्यक्त केला जात आहे. मराठा वनवास यात्रेला समर्थन म्हणून येत्या 17 तारखेला हजारो मराठा बांधव मुंबई मध्ये दाखल होणार आहेत. त्यापूर्वीची तयारी म्हणून भारतीय मराठा संघाचे संस्थापक,अध्यक्ष अविनाश पवार,उपाध्यक्ष दीपक पालांडे,आनंदा सकपाळ, सरचिटणीस राजेंद्र पालांडे, सचिव महेश महापदी,एस डी पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील,ठाणे महानगर संपर्क प्रमुख अरुण फणसे,ठाणे जिल्हा सचिव अनिल काकुलते,उद्योग आघाडी उपाध्यक्ष दिलीप लटके,कल्याण जिल्हा सचिव सीताराम कोकणे, राज्य कमिटी सदस्या सुनीता गव्हाने, कांजूरमार्ग अध्यक्षा सरिता मोरे,मुंबई शहर उपाध्यक्षा अनिता जाधव,महिला संघटक उज्वला दळवी,आशा शिंदे, अर्चना राणे,विमल गाडे आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
या ठिणगीचे वणव्यात रूपांतर होण्याच्या आधी मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात. जर चर्चाच करायची असेल तर मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदानात आले पाहिजेत.मराठ्यांना संविधानाच्या चौकटीत टिकणारे तसेच राज्यसरकारच्या अखत्यारीत असणारे ओबीसी आरक्षण द्यावे यासाठी ही वनवास यात्रा आहे. गेल्या दोन अडीच महिने गावोगावी जाऊन जनजागृती करत मुंबईत दाखल झाली आहे. कितीही जुलूम जबरदस्ती केली तरी आम्ही मैदान सोडणार नाही असे प्रतिपादन आन्दोलक योगेश केदार यांनी केले.